एज्युकेशन लोन. म्हणजेच शैक्षणिक कर्ज. याविषयी आपल्याकडे बरेच समज-गैरसमज
आहेत. ते कुणी घ्यावं, कुणाकडून घ्यावं याबाबत मुलं-मुलीच नाही तर पालकही
खूप अनभिज्ञ दिसतात. शिकताना आपल्या मुलाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा नको,
असं वाटल्यानं अनेक पालक स्वत:चं सोनं विकतात, गहाण टाकतात पण शैक्षणिक
कर्ज घेत नाहीत.
कितपत करणं योग्य असतं हे सारं.?
विशेषत: मेडिकल, इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ आणि अन्य उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांंना जर त्या शिक्षणाच्या फी साठी कर्ज उपलब्ध आहेत तर ती का घेऊ नये.?
ती फेडताना पालकांच्या नाकीनव येतात का.?
तर अजिबात नाही.
उलट बदलत्या काळात शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार मुलांनीच करायला हवा आणि त्याबाबतची सर्व माहिती करून घेऊन आपल्या शिक्षणाचा भार आपणच उचलायला हवा.
जर आपण एरवी सर्व बाबतीस स्वतंत्र आणि आधुनिक विचारांचे असतो तर मग आपण आपल्या शिक्षणाचा भार स्वत:च का उचलू नये. वडिलांकडे पैसे नाहीत या एका सबबीखाली शिक्षण थांबवायचं आणि आपण पुढं शिकू शकलो नाही याचा दोष आईवडिलांना किंवा परिस्थितीला द्यायचा हे काही योग्य नव्हे.
मुख्य म्हणजे पैसे नाहीत म्हणून शिक्षण थांबवावं किंवा सावकाराकडून अव्वाचे सव्वा व्याज देऊन पैसे घ्यावेत, असं करण्यापेक्षा शैक्षणिक कर्जाचा मार्ग निवडलेला बरा. शैक्षणिक कर्ज स्वस्त असतं हे लक्षात ठेवा.
त्यासाठी संपूर्ण माहिती करून घ्यावी. आणि निर्धास्त मनानं अभ्यासाला लागावं.
शैक्षणिक कर्ज कुणाला मिळतं.?
उच्चशिक्षण घेणार्या कुणाही विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळतं. ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल त्या अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीची फी म्हणून हे कर्ज मिळतं. दोन किंवा तीन वर्षांंंचा अभ्यासक्रम असेल तर प्रत्येक वर्षीच्या फी चा धनादेश वेगळा मिळतो.
धनादेश कुणाच्या नावे मिळतो?
धनादेश तुम्ही ज्या संस्थेत अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या संस्थेच्या नावे मिळतो.
कर्जाच्या रकमेत कुठल्या फी चा समावेश असतो.?
या रकमेत केवळ अभ्याक्रमाच्या शैक्षणिक फी चा समावेश असतो. डोनेशनचा नाही. ज्या आणि जेवढय़ा रकमेची पावती ती संस्था देते तेवढेच कर्ज मिळू शकते. त्यामुळे संस्थेकडे पावतीचा आणि योग्य फी घेण्याचा आग्रह तुम्हालाच धरावा लागतो. डोनेशन किंवा अँडमिशन करण्यासाठी जे अधिकचे पैसे संस्था घेतात त्यासाठी कर्ज दिले जात नाही.
फी वाढल्यास कर्जाच्या रकमेत वाढ होते का.?
होते. मात्र फी वाढ झाल्याचे पत्र तुम्हाला बँकेत जमा करावे लागते.
शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँक कशी निवडावी.?
क्यतो सरकारी बँकांची निवड करा. प्रत्येक बँकेत व्याजदर बहुतांश समान असतो. मात्र तरीही एकदा खात्री करून घ्या. इतर कर्जांच्या तुलनेत शैक्षणिक कर्ज स्वस्त मिळते. त्यामुळे बँक निवडताना भरवशाचीच बँक निवडा.
कर्जफेडीला सुरुवात कधी होते.?
नाही फेडले तर शिक्षण मध्ये थांबू शकते का.?
नाही. शिक्षण मध्ये थांबू शकत नाही. मात्र ठरलेले व्याज तुम्ही दरमहा भरणं उत्तम. कर्जफेडीला सुरुवात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वर्षभरानं प्रत्यक्षात कर्जफेडीला सुरुवात होते. अपेक्षा अशी की तोपर्यंत कर्ज घेणारा आपल्या पायावर उभा राहून कर्ज फेडू शकेल. शिक्षण सुरू असताना कर्जफेडीसाठी कुणीही तगादा लावत नाही.
नापास झालो तर..?
शेवटच्या वर्षाला नापास झाला तरी एका वर्षाचा अवधी मिळतो. पण मध्येच नापास झाला तर पुढील शिक्षणाची फी पुढच्या वर्गात गेल्यावरच मिळते. पण कर्ज काढून शिकताना नापास न होणंच उत्तम. आणि श्रेयस्कर.
कर्ज घेण्यासाठी कुठली कागदपत्रं लागतात.?
१) प्रवेश घेत असल्याचे आणि त्यासाठी अमुक फी हवी, असं सांगणारे संस्थेचे पत्र.
२) आधीच्या वर्षाची गुणपत्रिका.
३) निवासाचा पुरावा.
४) आई आणि वडील यांची गॅरेण्टर म्हणून सही. अन्य नातेवाईक भाऊ-बहीण-काका-मामा-मावशीही चालेल.
५) त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा.
उत्पन्न करात सूट.?
पालकांना या कर्जापोटी उत्पन्न करात सूट मिळू शकते.